सांगली : विश्रामबागमधील गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झालेल्या तरुणाचे पार्थिव बुधवारी कृष्णा नदीत आढळले. त्यांने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही.आर्यन जितेंद्र माने (वय १८, रा. विश्रामबाग) असे त्याचे नाव आहे. आर्यन माने हा विश्रामबाग परिसरातील गर्व्हेमेंट कॉलनीमध्ये वास्तव्यास होता. तो रविवार दि. ४ रोजी दुपारी क्लासला जातो असे सांगून तो घरातून निघून गेला होता. परंतु सायंकाळी तो घरी परतला नाही.

त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आर्यन माने याचा शोध सुरू असताना तो कृष्णा नदीवरील बंधार्‍याजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याने कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु त्याने आत्महत्या कोणत्या कारणातून हे मात्र समजू शकले नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.