आफताब पूनावाला याने श्रध्दाच्या हत्येनंतर त्यांच्या वसईतील घराचे सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. ज्या कंपनीने हे सामान दिल्लीला पाठवले होते त्या कंपनीच्या मालकाची रविवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवली. सलग तिसर्‍या दिवशी दिल्ली पोलीस वसई आणि मीरा रोड मध्ये या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा- आफताबने श्रद्धाचं शिर तलावात फेकलं, दिल्ली पोलिसांकडून तळं रिकामं करायला सुरुवात

श्रध्दा वालकर हत्येचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक शुक्रवारी वसईत दाखल झाले आहे. आफताब आणि श्रध्दा वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील व्हाईट हिल्स इमारती भाड्याने रहात होते. मे महिन्यात ते दिल्लीला शिफ्ट झाले. १८ मे रोजी आफताबने श्रध्दाची हत्या केली. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईच्या एव्हरशाईन येथील घराचे सामान दिल्लीला मागवले होते. मीरा रोड येथी ‘गुड लक मूव्हर्स ॲण्ड पॅकर्स’ला दिले होते. या कंपनीच्या गोविंद यादव याचा जबाब रविवारी दिल्ली पोलिसांनी नोंदवला. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना सादर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

दरम्यान, या प्रकरणाचे तीव्र पडसाद वसईत उमटत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी स्वस्तिक सेवा संस्थेमार्फत वसईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आफताबच्या प्रतिकात्मक पुतळाल्याला फाशी देण्यात आली व त्याच्या पुतळ्याला नागरिकांनी चप्पलेने मारहाण करत आपला संताप व्यक्त केला.