लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: मच्छिमारांनी मासेमारीसाठी टाकलेला गळ अडकल्याने अत्यवस्थ झालेल्या कासवाला अ‍ॅनिमल राहत व नेकॉन्सच्या सदस्यांनी वेळेत औषधोपचार करून जीवनदान दिल्याची घटना रविवारी सांगलीवाडीत घडली.

कृष्णा नदीच्या तीरावर सांगलीवाडीच्या बाजूला दत्ता कोळी यांना जखमी अवस्थेत कासव आढळले असल्याची माहिती नेकॉन्सचे प्रमोद जगताप यांना मिळाली. दोघांनी जाउन प्रत्यक्ष पाहणी केली असता कासवाच्या मुखात मासेमारीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी गळ अडकला असल्याचे दिसून आले. तोंडात गळ आरपार गेला असल्याने हाताने काढण्याचा प्रयत्न केला तर मुखाला अधिक मोठी जखम होण्याचा धोका तर होताच पण कासवाचा जीवही गमावण्याचा धोका होता. यामुळे कासवावर उपचार करण्यासाठी अ‍ॅनिमल राहतचे कौस्तुभ पोळ यांना कल्पना देण्यात आली. तसेच वन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा… “राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यातच कसं आलं?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅनिमल राहतचे डॉ. विनायक सूर्यवंशी यांनी कासवाला योग्य त्या प्रमाणात भुलीचे इंजेयशन दिले. भुलीच्या प्रभावामुळे बेशुध्द झालेल्या कासवावर शस्त्रक्रिया करून डॉ. सुर्यवंशी, डॉ. अजय बाबर, सागर भानुसे आदींनी कासवाच्या तोंडात आरपार अडकलेला गळ काढण्यात आला. संपूर्ण भूल उतरल्यावर काही काळ विश्रांती दिल्यानंतर कासवाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.