कोल्हापूर : आंदोलन तर करायचे पण तेझणझणीत मिसळ खाऊन?. तर अशा प्रकारचे आंदोलन कोल्हापुरात मंगळवारी घडले. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदान दुरुस्त करण्यासाठी यापूर्वी अनेकदा आवाज उठवण्यात आला. महापालिका प्रशासनाने २४ लाख रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र कसलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे आज आम आदमी पक्षाच्या वतीने परिसरातील तालीम संघ, फुटबॉल संघाच्या खेळाडू समवेत गांधी मैदानात मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. गांधी मैदानामध्ये मैदानामध्ये रात्रीच्या वेळी मद्य रिचवले जाते. सामिष आहाराची पार्टी केली जाते. यामुळे हे मैदान पार्टी करण्या – सारखेच आहे ; ही भावना व्यक्त करण्यासाठी येथे मिसळ पार्टी आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा: आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कोल्हापुरी मिसळचा तडका , खेळाडूंच्या सहनशीलतेचा भडका अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलस्थळी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंनी धारेवर धरले. त्यांनी मैदानाची दुरुस्ती लवकर करण्याचे आणखी एक आश्वासन दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The misal party movement was staged in the gandhi ground in kolhapur tmb 01