मागील काही दिवसांपासून दिवसागणिक ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि विशेषकरून सरकारी पक्षाकडून घडत आहेत. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की, महाराष्ट्रात आता लोकशाही मूल्यांव आधारीत असं सरकार अस्तित्वात आहे का? हा प्रश्न निर्माण होतोय. यामुळे हळूहळू महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललंय, असं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त. अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेतून महाविकासआघाडी सरकारवर केली.

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायच्या नाहीत म्हटल्या तरी, सोशल मीडियावर कुणी व्यक्त झालं आणि ते जर सरकारविरोधात असलं, तर एखाद्या युवकाचं मुंडण केलं जातं. सोशल मीडियावरचं कार्टून फॉरवर्ड केलं तर माजी, नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो. करोनाचे नियम भंग करून आरोपी मोकाट कसे फिरत आहेत, हे दाखवल्यावर एका पत्रकार गुन्हा दाखल केला जातो. एका संपादकाने सरकारविरोधात अतिशय टोकाची भूमिका घेतली तर घरातू घुसून त्याला अटक केली जाते. राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांचं वास्तव्य, असताना एटीएस आणि राज्याचं पोलीस थंड असतं. पहिल्यांदा असं घडलं आहे की राज्यात गृहमंत्री पदावर जे बसले होते, ते वॉंटेड आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसले, ते सापडत नाहीत. समोर रोज दिसणारा आमदार आपल्या पक्षाचा नाही. असं जाणवल्यावर त्यावर समोर दिसत असताना देखील, लूकआट नोटीस काढली जाते. त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आता राहीलं आहे का? आणि दुर्दैवाने महाराष्ट्र अराजकतेकडे चालला आहे. याचं चित्र हळूहळू स्पष्ट करत आहेत. सत्तेत बसणारी लोक देखील अराजकता करत आहेत आणि तक्रारदारांची काय स्थिती आहे, तर ते असहाय आहेत. सामान्य नागरिक असहायतेच्या दिशेने आहे. त्याची देखील अनेक उदाहरणं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, किरीट सोमय्यांवरील स्थानबद्धतेच्या कारवाईवरून देखील शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला, कालपासून आम्ही पाहतो आहे, आमचे नेते किरीट सोमय्या काय करत आहेत, तर कोल्हापूरात तक्रार दाखल करायला जात आहेत. तर त्यांना स्थानबद्ध करण्यात येतं. तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गावगुंडाना राज्यात मुक्ताता. हे यासाठी म्हणाव लागतं आहे, कारण जी काही नोटीस पोलिसानी दिली, त्यात किरीट सोमय्यांना काय सांगितलं जात आहे, तुम्ही इथं आलात तक्रार दाखल केली, तर तुम्हाला विरोध करणाऱ्या एका विशेष पक्षाची लोक कायदा हातात घेतील. प्रश्न हा आहे की, करीट सोमय्या हातात घेणार होते, की हे गावगुंड कायदा हातात घेणार होते? आणि जर पोलिसांनी हे माहिती आहे की एका विशिष्ट पक्षाची लोक कायदा हातात घेणार होते, तर कारवाई त्या गावगुंडांव केली पाहिजे, का तक्रारदारावर केली पाहिजे? त्यामुळे आम्ही म्हटलं आहे की तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त. असं यावेळी शेलार यांनी बोलून दाखवलं.