सांगली : सांगलीत रविवारी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नटराज पूजनानंतर स्थानिक कलाकारांनी नाट्यगीते सादर करून वाहवा मिळवली. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. यावेळी कार्यवाह विलास गुप्ते,कोषाध्यक्ष मेधा केळकर, विश्‍वस्त जगदीश कराळे, विवेक देशपांडे, बलदेव गवळी, आनंदराव पाटील, प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, भालचंद्र चितळे, नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन, सनित कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, श्रीनिवास जरंडीकर, हरिहर म्हैसकर, रवि कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी आदींसह नाट्यरंगकर्मी, नाट्यरसिक उपस्थित होते.

नटराजपूजनानंतर स्थानिक कलाकारांनी नाट्यगीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ अर्पिता नातू, भार्गवी सप्रे, रोहिणी, मृणाल, जान्हवी आणि ऋतुजा यांनी गायलेल्या नांदीने करण्यात आला.

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
mahavir jayanti celebration marathi news
सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

आणखी वाचा-अस्तित्वाचे प्रश्न दुर्लक्षून अस्मितेचे प्रश्न आणणे लोकशाहीचा खेळखंडोबा, मेधा पाटकरांचे मत

शैला देशपांडे जय शंकरा (मंदारमाला), भार्गवी सप्रे खेळेल का (राधामाई), अर्पिता नातू मी पुन्हा वनांतरी (भूमीकन्या सीता), जान्हवी वाकणकर मधुकर वन वन (विद्याहरण), आर्या खाडिलकर युवती मना (मानापमान), वृंदा गणपुले कोण तुजसम सांग (सौभद्र), आदित्य भोसले तोचि विश्‍वभंर (सुवर्णतुला), श्रीपाद सोहनी घेई छंद (कट्यार काळजात घुसली), अथर्व रत्नाकर मम आत्मा (स्वयंवर), ऋजुजा पटवर्धन नाही मी बोलत (मानापमान), शिरीन केळकर श्रीरंगा कमलाकांता (होनाजी बाळा) आणि शर्वरी केळकर अगा वैकुंठीच्या राया (कान्होपात्रा) आदींनी नाट्यगीते सादर केली.

आणखी वाचा- एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना, मुख्यमंत्र्यांकडून एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था

यावेळी आर्गनवर श्रेयस कुलकर्णी, हार्मोनियमवर अथर्व रत्नाकर आणि तबल्यावर मुकुंद कागलकर, शिरीष पिसे व कल्याण देशपांडे यांनी साथ केली.या कार्यक्रमाचे संयोजन स्वरदा खाडिलकर, राजेंद्र कानिटकर यांनी तर सूत्रसंचालन शशांक लिमये यांनी केले.

दरम्यान, मिरजेतील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये महापालिकेच्यावतीने रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रंगकर्मी बाळ बरगाले व नाट्य रसिक उपस्थित होते.