छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देण्याचा धडाका कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सुरूच ठेवला असून, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुधवारी बीड व धाराशिव शहरातील परीक्षा केंद्रांना भेट देताना त्यांना सामूहिक कॉपीचे प्रकार लक्षात आले. बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव सावरगावकर महाविद्यालयाच्या दोन कक्षांत हा प्रकार सुरू होता. या कक्षातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण कामगिरी रद्द करण्याचा आदेश कुलगुरू फुलारी यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २९ एप्रिल तर सहा मेपासून प्रोफेशनल अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू झाली आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना ‘सरप्राइज व्हिजिट’ दिली. बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय अशा तीन ठिकाणी भेट दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तीनही ठिकाणी अनुक्रमे १५, १५ आणि सहा असे ३६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आल्या. तसेच तीन मोबाइलही जप्त करून केंद्र संचालकांकडे सोपविण्यात आले. कुलगुरूंच्या अचानक भेटीमुळे पर्यवेक्षक व विद्यार्थ्यांची धांदल उडाली. डॉ. शाहिस्ता इनामदार या दोन दिवसांपूर्वीच विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून रुजू झाल्या आहेत. या वेळी भरारी पथकातील डॉ. प्रवीण यन्नावर, डॉ. भास्कर साठे व प्रा. सचिन भुसारी उपस्थित होते. चारही जिल्ह्यांतील सुमारे ६० परीक्षा केंद्रांना कुलगुरूंनी यापूर्वी भेट दिली होती.