महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- करोनाच्या मागे आपण ‘हात धुवून लागलो आहोत’ संकट संपणारच: उद्धव ठाकरे

ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद; मात्र लॉकडाउनबद्दल संभ्रमावस्था कायम

त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी काम केलं आहे. लष्करात वैद्यकीय सेवा बजावलेल्या व्यक्तींना करोनाग्रस्तांवर उपचारासाठी मदत करायची असेल तर त्यांनी Covidyoddha@gmail.com वर संपर्क करा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three diffrent hospitals to treat corona patients cm uddhav thackeray announcement dmp
First published on: 08-04-2020 at 14:09 IST