शेतात झोपलेल्या सासू, सासरे आणि पत्नीवर एकाने कुर्‍हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. धुळ्यातील कर्ले येथील शिंदखेडा शिवारात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश रतन मालचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमठाणेमधील शिंदखेडात राहणाऱ्या योगेश मालचेने पत्नी सुशिला मालचे, त्यांचे वडिल सतीश सोनवणे आणि आई जयवंताबाई सोनवणे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. सुशिला त्यांच्या आई वडिलांसोबत शेतात झोपल्या असताना योगेशने त्यांच्यावर हल्ला केला. योगेशने केलेल्या हल्ल्यात तिघेही जण गंभीर जखमी झाले. यानंतर सुशिला मालचे यांनी दोंडाई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर योगेश मालचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सतीश सोनावणे आणि जयवंताबाई सोनावणे हे नथू पाटील यांच्या शेतात जागले म्हणून काम करतात. योगेश मालचेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर दोंडाईचा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three injured after attacked with ax in dhule
First published on: 16-02-2017 at 19:26 IST