मोटार-बसच्या अपघातात तीन ठार

पुणे-बंगलोर महामार्गावर वळसे येथे मोटार आणि आराम बस यांचा अपघात होऊन तीन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले.

पुणे-बंगलोर महामार्गावर वळसे येथे मोटार आणि आराम बस यांचा अपघात होऊन तीन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले.
कोल्हापूर येथील कोठारी कुटुंबीय नगर येथून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून कोल्हापूरला जाताना हा अपघात झाला. यात सुचिता प्रकाश कोठारी(वय ३१) प्रकाश जितुलाल कोठारी (वय ३५) तसेच त्यांचा मित्र संजय छगनलाल जैन (रा.चेन्नई) हे तिघे ठार झाले. मोटारचालक विक्रम देवकर याला डुलकी लागल्याने गाडी आरामबसवर आदळली. यात देवकर आणि कोठारी दाम्पत्याचा अडीच वर्षांचा मुलगा अंश गंभीर जखमी झाले आहेत. बोरगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three killed in car bus crash