रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु झाला. हा अपघात रविवारी सकाळी कळंबोली येथे झाला. या अपघातात दोन मुली जखमी झाल्या आहेत.
आंध्रप्रदेश येथे राहणारे विश्वनाथ राव हे आपल्या कुटुंबासह खासगी बसने पुण्याला जात होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास बसचालकाने राव कुटुंबाला चुकून कळंबोली येथे उतरवले. त्यामुळे राव कुटुंब रस्त्याच्या   बाजूने पुढे जात होते. त्यावेळी कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने राव कुटुंबाला जोरात धडक मारली.
या अपघातात विश्वनाथ राव (वय ४५), शिला राव (वय ३५) आणि कांता (वय ४५) यांचा मृत्यू झाला. या अपघातात प्रतिमा (वय २३) ही किरकोळ जखमी झाली. तीच्यावर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सूरू आहेत. राव यांच्या कुटूंबातील अमुल्य ही मुलगी अपघातात बचावली असल्याचे माहिती कामोठे पोलीसांनी दिली. या अपघाताप्रकरणी कामोठे पोलीस टेम्पोचा फरार चालक राजू याचा शोध घेत
आहेत.