कॉग्रेस नेत्यांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी व नागरिक अशा १७ जणांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड करून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मदन वाघाडे, अमित गावंडे व रोशन बावणे अशी या तिघांची नावे आहेत. यातील दोघे रेती तस्करीत सक्रीय आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिव्हील लाईन वॉर्डात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत काही गावगुंडांनी धुमाकूळ घातला होता. तेव्हा या गावगुंडांनी कॉग्रेस नेते, व्यापारी व उद्योजक अशा एकूण १७ जणांच्या चारचाकींची तसंच ट्रॅव्हल्स कंपनीच्या वाहनांची तोडफोड केली होती. गाड्यांचे मागील आणि समोरील काच फोडण्यासोबतच तेथील महागड्या वस्तूही चोरल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे सर्वत्र भीती आणि दहशतीचे वातावरण परसले होते.

या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलीसांनी या दहशत पसरविणाऱ्या गावगुंडांचा मागोवा घेत स्नेह नगर येथील अमित गावंडे, वडगाव येथील मदन वाघाडे आणि बोर्डा येथील रोशन बावणे या तिघांना अटक केली. या तिघांनाही आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका झाली. विशेष म्हणजे या तिघांपैकी दोन जण रेती तस्करीत सक्रीय आहेत. या तीन गावगुंडांनी घातलेल्या गोंधळामुळे शहरातील १७ जणांच्या वाहनांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people arrested vehicle vandalism maharashtra chandrapur jud
First published on: 09-05-2020 at 19:04 IST