बाबासाहेब आणि यासीन मिस्त्री या राम-लक्ष्मणाच्या जोडीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिग्दर्शक कसा असावा, हे मी बाबासाहेबांमध्ये पाहिले. त्यांच्याकडे काम करायला मिळाले हे आपले भाग्य असल्याचे समाधान ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले.
येथील प्रभात थिएटरचा अमृतमहोत्सव बाबासाहेब आणि यासीन मिस्त्रींच्या आठवणींनी शानदार सोहळय़ाने पार पडला. गेल्या ७५  वर्षांत अगदी मूकपटापासून कृष्णधवल, रंगीत सिनेस्कोप, थ्रीडी चित्रपटांपर्यंत प्रभात चित्रपटगृहाने सिनेशौकिनांना हजारो चित्रपटांची मेजवानी दिली. संजोग, जय संतोषी माँ, संगम अशा एकाहून एक सरस चित्रपटांनी प्रभातच्या पडद्यावर सुवर्णमहोत्सव साजरा केला होता.
काळे म्हणाल्या, की बाबासाहेबांनी दिग्दर्शकातील माणूसपण जपले. त्यामुळेच ते लोकप्रिय झाले. आरिफ मिस्त्री यांनी बदलत्या युगातही प्रभात थिएटर चांगल्या पध्दतीने चालवले आहे.
आरिफ मिस्त्री म्हणाले, की बाबासाहेब मिस्त्रींनी प्रभात थिएटर सुरू केल्याने या विभागातील सिनेशौकिनांना ७५ वर्षांपासून तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. येथे चित्रपटाबरोबरच नाटकेही होत असत. बदलत्या परिस्थितीनुसार प्रभातचे रूपडेही आम्ही बदलत आलो. प्रभातमध्ये वातानुकूलित यंत्रणा व दोन स्क्रीन आहेत. आता तीन स्क्रीन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रभातचे व्यवस्थापक दिलावर शेख, विवेक दामले, नियन जोशी, नावंधर यांनी मनोगत व्यक्त केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकराडKarad
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three screen will be prabhat theatre in karad
First published on: 02-04-2014 at 03:42 IST