चंद्रपूर : अंबुजा सिमेंट लेबर कॉलनीमागील मंगी गावालगतच्या नाल्यात आंघोळ करण्यासाठी गेलेली तीन मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. सार्थक शशिकांत अल्हाट (१२) रा. उप्परवाही, मंजित विजय सिंग (१४) उप्परवाही, शुभम दिवाकर गाजेरे (१४) रा. रामटेक अशी  मृत मुलांची नावे आहेत. सुटीमुळे  सकाळी चौघेजण फिरण्यासाठी नाल्याजवळ गेले होते. सार्थक, मंजित व शुभम यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी अनुनय हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला नाही. बराच वेळ होऊनही सार्थक, मंजित व शुभम हे तिघेही पाण्याबाहेर न आल्याने अनुनयने अंबुजा सिमेंट कॉलनीकडे धाव घेतली व ती माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अंबुजा सिमेंटचे सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सार्थक शशिकांत अल्हाट, मंजित विजय सिंग, शुभम दिवाकर गाजेरे यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तिघांनाही गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three students died after drowning in open drainage
First published on: 03-05-2019 at 03:28 IST