मुंबई : महारेराकडे नोंदणी असलेले साधारण तीन हजार गृह प्रकल्प विकासकांनी अर्धवटच सोडल्याचे दिसत आहेत. या विकासकांनी निश्चित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत किं वा ते पूर्ण करण्यासाठी मुदतवाढही घेतलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेरा कायद्यानुसार विकासकांनी त्यांच्या प्रकल्पाची नोंदणी करणे आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख जाहीर करणे बंधनकारक आहे. प्रकल्प वेळेतच पूर्ण करणेही कायद्याने बंधनकारक आहे. व्यावसायिकांनी सांगितलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ दिली जाते. मुदतवाढीच्या कालावधीतही प्रकल्प पूर्ण झाला नाही तर हा प्रकल्प ‘लॅप्स प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केला जातो. महारेराने २०१७ पासून २०२१ पर्यंतची अशा प्रकल्पांची आणि विकासकांची यादी तयार केली आहे. या यादीत राज्यातील तीन हजारांहून अधिक गृह प्रकल्प असल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी दिली. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईतील प्रकल्पांची यात संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thousand housing projects in the maharashtra still incomplete zws
First published on: 28-07-2021 at 02:59 IST