नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका वयोवृद्ध महिलेचं तिच्या लेकांनी जिवंतपणीचं दहावं आणि तेरावं घातलं आहे. संबंधित महिला एका वृद्धाश्रमात राहते. आई घरी नसताना मुलांनी तिचं दहावं आणि तेरावं घातलं आहे. मुलांनी केलेल्या कृत्याची माहिती मिळताच संबंधित महिला बेशुद्ध झाली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली आहे.

कमलाबाई हिरे असं संबंधित महिलेचं नाव आहे. त्या सध्या कळवण सप्तशृंगी अनाथाश्रमात वास्तव्याला आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्या इथे राहत आहेत. दरम्यान, कमलाबाई हिरे यांच्या मुलां त्या मृत असल्याचं दाखवून जिवंतपणीच त्यांच दहावं आणि तेरावं घातलं आहे. कमलाबाई यांच्यावर नावावर १३ एकर जमीन आहे, ही जमीन हडपण्यासाठीच मुलांनी आपल्याला मृत घोषित केलं असावं, अशी माहिती कमलाबाई हिरे यांनी दिली आहे.

हेही वाचा- VIDEO: ….अन् रिक्षाचालकाने तरुणीला रस्त्यावरुन फरफटत नेलं, ठाण्यातील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

तसेच आपला मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने आपल्या मृत्यूचा दाखला मुलांना देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १३ एकर जमिनीसाठी आपल्या जन्मदात्या आईचं अशाप्रकारे दहावं आणि तेरावं घातल्याची बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.