राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राने आज करोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो. ” असं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याचबरोबर करोनाविरुद्धच्या लढाईत देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीची रहिवासी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today maharashtra crossed benchmark of administration of 100 million covid vaccine doses msr
First published on: 09-11-2021 at 19:43 IST