सावंतवाडी : मुंबई पुणे तसेच महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य शासनाने टोलमाफीची घोषणा केली टोल माफीसाठी पासेसही वितरण केले मात्र ही टोलमाफी केवळ कागदावरच राहिल्याची घटना घडत असून याबद्दल गणेश भक्तामध्ये चाकरमान्यांन्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई पुणे तसेच अन्य भागातून येणाऱ्या कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना राज्य शासनाने दिलेली माफी फसवी असल्याची बाब समोर आली असून साखरमाऱ्यांची वाहने टोल वरून गेल्यानंतर काही क्षणात त्यांच्या खात्यामधून टोलची रक्कम डेबिट झाल्याची घटना घडली आहे

पुणे धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे विश्रांतवाडी पोलीस चौकी मधून पथकर माफी  (टोल माफी) चा पास देण्यात आला संबंधित अधिकाऱ्याने या पास ची नोंद करून घेतली आणि पथकर माफीचा पास वितरित केला टोल माफीचा पास परवाना मिळवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली कुठून कुठे पर्यंत प्रवास करणार कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रवास करणार याबाबतची इत्यंभूत माहिती या अधिकाऱ्याने नोंदवून घेतली दरम्यान हा पथकर माफीचा पास घेऊन त्यांनी पुण्याहून सावंतवाडी गाठली दरम्यानच्या तीन टोलवर त्यांनी आपला टोल माफीचा पास दाखवला असता त्यानी टोल नाक्यावरून जाण्याची परवानगी दिली मात्र त्यांची कार टोल वरून पास झाल्यानंतर ते चहापानासाठी थांबले असता तिन्ही टोल वाल्यांनी आपली रक्कम काही अंतराने डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. याबाबत त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

सुरुवातीला त्यांना खेड शिवापुर टोल नाका मिळाला त्यानंतर आणेवाडी टोल नाका मिळाला त्यानंतर तिसरा टोल नाका तसवडे मिळाल्यानंतर ते अनुस्कुरा घाटातून कोकणात दाखल झाले टोल माफी असल्यामुळे ते आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले मात्र सुरुवातीला मिळालेल्या खेड शिवापुर टोल नाक्याचे रुपये १२५ त्यांच्या खात्यातून डेबिट झाले तसा मेसेज त्यांना आला त्यानंतर दुसरा टोल नाका आनेवाडी चा टोल नाक्या मधून ८५ रुपये डेबिट झाले आणि तिसरा टोल नाका तसवडे या टोलनाक्याचे ७५ रुपये असे मिळून एकूण रुपये २८५ त्यांच्या खात्यामधून डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला तर मग राज्य शासनाने जाहीर केलेली टोल माफी या चाकरमान्यांला मिळालीच नाही. अशाप्रकारे अनेक जणांना टोलची रक्कम त्यांच्या खात्यात डेबिट झाली .

 सवंग प्रसिद्धीसाठी राज्यकर्त्यांकडून गणेश भक्त चाकरमान्यांसाठी टोल माफीची घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्षात ही टोल माफी चाकरमानांना मिळत नाही उलट त्यांना टोल द्यावा लागतो ही याबाबतची ही ताजी घटना असून अशा अनेक गणेश भक्तांना याबाबत रक्कम डेबिट झाल्या असून ही रक्कम राज्य शासनाच्या टोल विभागाकडून त्यांना परत मिळणार काय असा सवाल आता या निमित्ताने विचारला जात आहे याचबरोबर परतीच्या प्रवासाला सुद्धा टोल माफी असणार की त्यांनाही टोलची रक्कम द्यावी लागणार याबाबतचा खुलासा राज्य शासनाकडून व्हावा अशी मागणी आता गणेश भक्त चाकरमान्याकडून होत आहे.