रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी मिरजेनजीक विजयनगर स्थानकाजवळ हा अपघात घडला. रेल्वेच्या धडकेने ट्रॅक्टरचे 6 तुकडे झाले होते.
कल्लू गणपती हेगडे (वय ३२, रा. नरवाड) हा शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर (क्र. एम.एच.१०-एआय-६९४५) घेऊन जात असताना मिरजेहून बेळगावला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने विजयनगर स्थानकाजवळ असणाऱ्या विनाचौकीदार गेटवर जोरदार धडक दिली. यामध्ये हेगडे हा जागीच ठार झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
रेल्वेच्या धडकेत ट्रॅक्टरचालक ठार
रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ट्रॅक्टरला पॅसेंजरने धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी मिरजेनजीक विजयनगर स्थानकाजवळ हा अपघात घडला.
First published on: 05-04-2014 at 03:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tractor driver killed in railway accident