Pandharpur Ganesh Visarjan 2025 पंढरपूर : निरोप देतो आज्ञा असावी … चुकले आमचे काही क्षमा असावी असे म्हणत घरगुती गणरायाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. गौरी सोबत गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक घरांतील गणरायाला भावपूर्ण वातावरणात आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणी करीत निरोप देण्यात आला.

या वर्षी पालिकेने ५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहेत. या ठिकाणी मूर्ती दान करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. अनंत चतुर्थी दिवशी शहरात विविध १४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी निर्माल्य गोळा केले जाणार आहे. दरम्यान, चंद्रभागा नदीला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी नदी पात्राच्या बाहेर आले आहे. तसेच पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात विसर्जन न करता पालिकेच्या मूर्ती संकल केंद्रात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गौरीसोबत गणरायाला निरोप देण्याची पद्धत आहे. दीड दिवस, तीन, सात दिवस आणि अनंत चतुर्थी अशा दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्या प्रमाणे येथील घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला. गेली सात दिवस लाडक्या गणरायाचे आगमनपासून ते विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सातव्या दिवशी सकाळी गणरायाची विधिवत पूजा, आरती करण्यात आली. सायंकाळी पुढच्या वर्षी लवकर, या अशी भावनिक साद घालून निरोप देण्यात आला. पूर्वी चंद्रभागा नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. मात्र, गेले काही वर्षांपासून पालिका मूर्ती संकलन करत आहे.

पालिकेने शहरात ५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहेत. या ठिकाणी जास्तीचे कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. तर अनंत चतुर्थी दिवशी शहरात विविध १४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी निर्माल्य गोळा केले जाणार आहे. दरम्यान, चंद्रभागा नदीला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी नदी पात्राच्या बाहेर आले आहे. तसेच पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात विसर्जन न करता पालिकेच्या मूर्ती संकल केंद्रात द्यावी. पालिका योग्य पद्धतीने विसर्जन करेल, असे पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. नदी काठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी गणरायाची आरती करून मूर्ती देताना पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी करीत निरोप देण्यात आला.