राहाता : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ समोर घडली. शिर्डी पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध आज रविवारी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. सानुकुमार नवीन ठाकूर (वय १८, रा. शिर्डी, मूळ रा. बिहार ) असे मृत तरुणाचे नाव आहे. साई सुनील कुमावत (वय १९), शुभम सुरेश गायकवाड (वय १९, दोघेही रा. शिर्डी) या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
तिसरा आरोपी हा अल्पवयीन आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्याला चौकशीअंती सोडून दिल्याचे गलांडे यांनी सांगितले. याबाबत मृत सानुकुमार याचे वडील नवीन कुमार ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सानुकुमार याची साई कुमावत व शुभम गायकवाड यांच्यासोबत मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून बाचाबाची होऊन साई कुमावत व शुभम गायकवाड यांनी सानुकुमारला ठार मारले. या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी साई कुमावत व शुभम गायकवाड या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल के
पोलिस या हत्येमागील नेमके कारण आणि वादाचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता पसरली आहे. यात एक आरोपी शिवसेनेचा (ठाकरे गट) पदाधिकारी आहे.
आरोपी नशेत
या घटनेतील आरोपी व मृत तरुण हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात आपसात वैमनस्य होते. दोन्ही आरोपी नशेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे. – सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
नशा पदार्थ विक्रीस आळा घाला
शिर्डी व राहाता परिसरात तरुण मुले वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात आहेत. नशा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिर्डीत तीन जणांनी झोपलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खिशातून पैसे काढताना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही शिर्डीत नशेखोरांनी साईबाबा संस्थानमध्ये कामासाठी जाणाऱ्या दोन तरुणांची हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन मुलांनी मौजमजा करण्यासाठी अपहरण करून खून केल्याची घटना घडली. आता पुन्हा सानुकुमार या तरुणाचा खून झाला. शिर्डी परिसरातील नशेच्या पदार्थांच्या विक्रीस आळा घालावा. – प्रमोद गोंदकर,सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी.