जालना : उत्तर प्रदेशातून अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी जालना शहरातील चन्दनझिरा भागातून अटक केली आहे. सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार उत्तर प्रदेश राज्यातील मैनपुरी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.
गेल्या जुलै महिन्यात तेथे याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आयाज अन्सारी, मकसूद अन्सारी आणि फैजान अन्सानी (राहणार गोलानाजार, मैनपुरी ) या तिघांच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेल्याची फिर्याद मैनपुरी जिल्हयातील पोलिसांकडे देण्यात आली होती.
जालना पोलिसांनी शहरातील चंदनझिरा भागात या गुन्हयातील दोन आरोपींना अटक केली.फैजान अन्सारी आणि आयाज अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी पळवून आणलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस जालना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचप्रमाणे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीना मैनपुरी कोतवाली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिनेशकुमार यांच्या ताब्यात देण्यात आले.
चन्दनझिरा पोलिसांनी नियोजनबध्द रितीने आणि गुप्त पद्धतीने या भागातून माहिती मिळवून ही कारवाई केली. चन्दनझिरा पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब पवार आणि मैनपुरी कोलवाली पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी या प्रकरणात तपास केला.