अलिबाग: पेण तालुक्यातील पाबळ बरडावाडी येथील नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ईलान बेंजामिन वासकर (२५) आणि इजरायल बेंजामिन वासकर (२२) अशी मृत तरुणांची नावे असून ते अलिबाग तालुक्यातील रेवदंडा थेरोंडा येथील रहिवासी आहेत.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आलं आहे. आपल्या अन्य दोन मित्रांसह दोघेही पावसाळी पर्यटनाला आले होते. तिथं नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न दोघेही वाहत जाऊन बुडाले. या घटनेने थेरोंडा परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वडखळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा केला आहे.