लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरात करोनाचा वाढता उद्रेक थांबण्याचे नाव घेत नसून बुधवारी आणखी दोघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या ४२ झाली. जिल्ह्यात आज २० नवे रुग्णही आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ८८४ वर पोहोचली. सध्या २६५ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला शहरासह जिल्ह्यात करोनाचा संसर्ग पसरतच आहे. मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र आजही कायम राहिले. आणखी दोन मृत्यू व २० नव्या रुग्णांची नोंद बुधवारी झाली. जिल्ह्यातील एकूण १३६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ११६ अहवाल नकारात्मक, तर २० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ८८४ झाली. आतापर्यंत एकूण ४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. दरम्यान, आज उपचारादरम्यान दोन रुग्ण दगावले आहेत. हरिहरपेठ भागातील गाडगे नगर येथील रहिवासी ६२ वर्षीय रुग्णाला ६ जून रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय रुग्णाला २९ मे रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचाही आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

आज सकाळी २६ नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. सायंकाळी प्राप्त झालेल्या ११० अहवालांमध्ये ९० नकारात्मक, तर २० करोना सकारात्मक रुग्ण आढळून आले. यामध्ये महिला व पुरुष प्रत्येकी १० आहेत. त्यातील ११ जण वाडेगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवासी आहेत. सावकार नगर, कौलखेड, देशपांडे प्लॉट, वाठुरकर नगर मंगरुळपीर रोड, बार्शिटाकळी तालुक्यातील सिंदखेड, देवी पोलीस लाईन, विजय नगर, जुने शहर व हांडे प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधित आढळून आलेले परिसर तात्काळ प्रतिबंधित करून जवळून संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. शहरात घरोघरी सव्र्हे करून आरोग्य तपासणी सुरू आहे. विविध उपाययोजना करूनही करोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण व वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात न आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

३२ जणांना रुग्णालयातून सुट्टी
आतापर्यंत जिल्ह्यातील ५७७ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यात आज रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या ३२ जणांचा समावेश आहे. आज सकाळी १४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. दुपारनंतर आणखी १८ जणांना सुट्टी मिळाली. त्यातील १४ जणांना घरी तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले. हे ३२ जण शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत.
५८४६ अहवाल नकारात्मक
आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ६७८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६४९१, फेरतपासणीचे ११२ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १७८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७३० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ५८४६ आहे, तर सकारात्मक अहवाल ८८४ आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more deaths in akola due to corona total positive cases 884 till today scj
First published on: 10-06-2020 at 21:13 IST