सांगली टू दुबई व्हाया ताडसर… ७८ वर्षीय आजोबा ठरले ‘ड्रॅगन फ्रूट’ची निर्यात करणारे पहिले भारतीय शेतकरी

“सहा वर्षापूर्वी मला साताऱ्यामधील एका शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटच्या पिकाची माहिती मिळालेली. या पिकाला कमी पाणी लागतं. मी सेंद्रीय खतं वापरलं. त्याचा फायदा झाला”

Sangli farmers export 100 kg pink white dragon fruit to Dubai
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून फळाचा आकार आणि चव अगदी हवी तशी आणि दर्जेदार निघाली.

सांगलीमधील ताडसर आणि वांगी या दोन छोट्या गावांमधील दोन वयस्कर शेतकऱ्यांची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे या दोघांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं आहे. इतकच नाही तर त्यांनी हा माल थेट दुबईला निर्यात केलाय. विशेष म्हणजे अशाप्रकारे भारतातून एखाद्या शेतकऱ्याने परदेशामध्ये ड्रॅगन फ्रूट पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतामध्ये उत्पादन घेतलं जाणारं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचं या दोघांनी उत्पादन घेतलं असून १०० किलो माल त्यांनी दुबईला पाठवल्यांचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या दोघांनाही आपल्या शेतांमध्ये घेतलेल्या उत्पादानापैकी प्रत्येकी ५० किलोचा माल दुबईला पाठवला आहे. हे फळ कमळाच्या फुलासारखं दिसत असल्याने त्याला कमलम असंही म्हटलं जातं. सांगलीसारख्या दुष्काळग्रस्त भागातील १५० एकरावर ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जात आहे. या फळाला चांगली मागणी असून या पिकाच्या आधारे येथील शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. सांगली जिल्ह्यामधील कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात द्राक्षं आणि ऊसाचं उत्पादन घेण्याऐवजी आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटचं पिक घेताना दिसत आहे.

नक्की वाचा > गजा गेला… ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील बैलाचं निधन

७८ वर्षीय आनंदराव पवार यांनी खेडगाव तहसीलमधील आपल्या ताडसर या गावी सहा वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ड्रॅगन फ्रूटचं पिकं घेतलं. हे गाव समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर आहे. “मी ऊसाऐवजी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आमचं शेत उंचावर आहे. सहा वर्षापूर्वी मला साताऱ्यामधील एका शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटच्या पिकाची माहिती मिळालेली. या पिकाला कमी पाणी लागतं. मी सेंद्रीय खतं वापरलं. त्याचा फायदा झाला. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून फळाचा आकार आणि चव अगदी हवी तशी आणि दर्जेदार निघाली. माझ्या शेतामधील ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची मोठ्या आकाराची फळं दुबईला पाठवली आहे,” असं पवार सांगतात.

पवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहून वांगी गावातील राजाराम देशमुख यांनीही ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेण्याचं ठरवलं. दीड एकरामध्ये राजाराम यांनी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं. पुढील वर्षी ते पाच एकरामध्ये उत्पादन घेणार असल्याचं सांगतात.

सांगली जिल्ह्याचे कृषी निरिक्षक बसवराज मास्तोली यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. कोरड्या ठिकाणी या फळाचं उत्पादन घेतलं जातं. प्रामुख्याने आटपाडी, जत आणि खेडेगावमध्ये हे उथ्पादन घेतलं जाते. जास्त पाणी लागणाऱ्या ऊसारख्या पिकापेक्षा आणि अधिक खर्च असणाऱ्या द्राक्षाच्या पिकापेक्षा या पिकाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यामधून शेतकऱ्यांना मोठा नफा देखील मिळत असल्याचं बसवराज सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two sangli farmers export 100 kg pink white dragon fruit to dubai first from india scsg

ताज्या बातम्या