सांगली : विटा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लुटणाऱ्या दोन महिलांना विटा पोलीसांनी अटक केली आहे. या महिलांकडून चोरीतील सुमारे सव्वा लाख रुपयांचे दागिने, मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.
विटा बस स्थानकावर बसमध्ये बसत असताना येडे मच्छिंद्र (ता. वाळवा) येथील महिला जयश्री जगताप यांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
विटा बस स्थानकात संशयास्पद वावरत असताना चमेली पवार (रा. आटपाडी) व प्रिया काळे (रा. मंगळवेढा) या दोन महिलांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. चोरीस गेलेला मुद्देमालही या दोन महिलांकडून हस्तगत केला असल्याचे निरीक्षक श्री. फडतरे यांनी सांगितले.