“स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. अजित पवारांनीही अशीच भूमिका घेतली. पण आता त्यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागत आहेत. डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे. आम्ही स्वाभिमानाने २३ जागा लढत होतो आणि २३ जागा लढत राहू. पण जी डुप्लिकेट शिवसेना आहे, त्यांच्या वाट्याला पाच जागाही येत नाहीत. कुत्र्यापुढे हाडूक फेकावे, अशा पाच जागा दिल्या आहेत. अजित पवारांची तर दोन-तीन जागांवर बोळवण केल्याचे दिसत आहे”, असा शब्दात उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. लोढा यांच्याहस्ते शिवसेना शाखेचे उदघाटन करावे लागते, इतके वाईट दिवस शिवसेनेवर कधीही आले नव्हते. ज्या बिल्डरांनी त्यांच्या गृहसंकुलात मराठी माणसांना घुसण्याची परवानगी दिली नाही, त्या बिल्डरांकडून फक्त डुप्लिकेट शिवेसेनेच्या शाखेचे उदघाटन होऊ शकते, स्वाभिमानी शिवसेनेचे नाही, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

Advocate Ujjwal Nikam
मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांचा पत्ता कट
sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!

“काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “तुमचा एक मुख्यमंत्री…”

अजित पवारांच्या चौकशांचे काय झालं?

जरांडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीचं काय झालं? असा प्रश्न संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर उपस्थित केला. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचे आरोप भाजपाने केले होते, त्या आरोपांचे काय झालं? अजित पवारांचे सर्व आरोप भाजपाबरोबर गेल्यामुळं धुतले गेले काय? जे स्वाभिमान लोक तुमच्याविरोधात लढत आहेत, त्यांना त्रास देऊन तुम्ही लोकसभा निवडणूक जिंकू पाहत आहात. पण संजय राऊत असो की रोहित पवार असो, स्वतः शरद पवार असतील. आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाहीत. आम्ही लढू आणि एक दिवस येईल की, त्यांनाच आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील, असे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीच्या मोघलशाहीसमोर झुकणार नाही

संजय राऊत पुढे म्हणाले, “आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबाला मी ओळखतो. ते चुकीचं काम करू शकत नाहीत. रोहित पवारांची चौकशी करून त्यांचा वारंवार छळ केला जात आहे. रोहित पवारांनी काय गुन्हा केला? त्यांचा उद्योग आहे, त्यात काही गोष्टी वर-खाली झाल्या असतील म्हणून धाडी टाकून त्यांच्या मालमत्ता जप्त करून बदनाम करणं योग्य नाही. महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोघलशाहीसमोर न झुकण्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतल्यामुळेच त्यांचा छळ केला जात आहे. महाराष्ट्राचे लचके तोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे सुरू असताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शांत बसले आहेत. पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्याविरोधात ठामपणे उभे आहोत.”

Lok Sabha Elections 2024 : खलबते अंतिम टप्प्यात; शिंदे, अजित पवारांची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न

रोहित पवार यांनी भाजपामध्ये जावे का?

रोहित पवार यांच्यावरील कारवाई थांबवायची असेल तर त्यांनी काय करायला पाहीजे, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. त्यांनी भाजपामध्ये जावं का? पण रोहित पवार त्यांच्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत. ते कुठेही जाणार नाही. तुम्हाला किती कारवाई करायची ती करा, हा महाराष्ट्र लढत राहिल. रोहित पवार यांच्यासारखीच कारवाई अजित पवारांवर झाली, त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात गेले. त्यांच्यावरील कारवाई थांबली. प्रफुल पटेल यांच्यावरही इक्बाल मिर्ची प्रकरणी कारवाई झाली, तेही भाजपात गेले. हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण अशी अनेक नावे घेता येतील, असेही संजय राऊत म्हणाले.