Uday Samant महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकीकडे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत चर्चा असताना दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत ( Uday Samant ) यांच्या एका वक्तव्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यासंदर्भातली खरी पोस्ट वेगळी असून काही समाजकंटकांनी त्यावरच्या मजकुरात फेरफार करून ती व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला. तरीही उदय सामंत यांनी दैनिक लोकसत्तालाच जबाबदार धरलं होतं. मात्र अखेर त्यांनी ती पोस्ट डिलिट केली आहे तसंच दैनिक लोकसत्ताचा काही दोष नसल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

उदय सामंत ( Uday Samant ) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाचा संदर्भ दिल्याचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं सांगितलं. “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोंमल्याचं संघटन वाढवणार काय? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झाले”, असं उदय सामंत यांनी म्हटल्याचं या व्हायरल कार्डमध्ये म्हटलं आहे. मात्र हे वृत्त खोडसाळपणे केले गेले आहे.

Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर

लोकसत्ताची खरी पोस्ट काय?

दरम्यान, ‘लोकसत्ता’च्या नावे व्हायरल होणारा हा मजकूर ‘लोकसत्ता’नं दिलेला नसून कुणीतरी खोडसाळपणा केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकसत्तानं दिलेल्या मूळ कार्डमध्ये असणारा मजकूर वेगळाच असल्याचं समोर आलं आहे. “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे”, असा मूळ मजकूर त्या कार्डवर आहे. ही बाब आता उदय सामंत ( Uday Samant ) यांनाही पटली आहे. त्यामुळे त्यांनी लोकसत्ताचा अवमान करायचा हेतू नव्हता असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे उदय सामंत यांचं स्पष्टीकरण?

दैनिक “लोकसत्ता” चा लोगो वापरून प्रसारित करण्यात आलेल्या एका बातमी संदर्भात मी आज माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून पोस्ट केली होती. या पोस्ट शी “लोकसत्ता” चा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, ही बातमी फेक असून कोणीतरी लोकसत्ताचा लोगो वापरून खोटी केली आहे हे कळल्यावर मी केलेले ट्वीट डिलीट केले आहे..ह्या मध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता..आणि वृत्तपत्राचा अवमान करण्याचा मानस देखील नव्हता. असं उदय सामंत ( Uday Samant ) यांनी म्हटलं आहे.

आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी लोकसत्ताचं एडिट केलेलं कार्ड दाखवलं होतं. ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरही केली होती. हा सगळा खोडसाळपणा असल्याचं लक्षात आल्यावर उदय सामंत यांनी पोस्ट डिलिट केली आणि हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Story img Loader