शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली. सध्या शिवसेना पक्षातील दोन गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून लढाई सुरू आहे. हा लढा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात लढला जातोय. असे असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. असे असताना शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, असा प्रश्न विचारला जातोय. याच प्रश्नावर शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा >>> “मोहन भागवतांनीच पापक्षालन करावं, नराधमांच्या हाती हिंदू..”, ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघाचं टीकास्र!

महाविकास आघाडीने या पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. भाजपा-शिवसेनेने (शिंदे गट) कोणाला तिकीट द्यायचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे, त्यावर आमचा आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

हेही वाचा >>> भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचे मोठे विधान, म्हणाले “संघ आणि वीर सावरकर तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदय सामंत यांनी धनुष्यबाण निवडणूक चिन्ह तसेच शिवसेना पक्षासंदर्भात सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. निवडणूक आयोगावर बोलणे योग्य नाही. कोणाबरोबर किती आमदार, खासदार आहेत? कोणी किती शपथपत्रे दिली आहेत, याची माहिती आता काही लोकांना मिळालेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. बळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. त्यांच्यासोबत किती राज्यप्रमुख, खासदार आमदार, नरसेवक, पदाधिकारी आहेत, याची माहिती झालेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेली शपथपत्रे खोटी असल्याचा दावा केला जातोय, असेही उदय सामंत म्हणाले.