खासदार उदयनराजे भोसले यांनी आज(बुधवार) मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवारांची व त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.

दरम्यान, दिल्ली येथे शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून उदयनराजेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार उदयनराजे यांच्यात मुंबईत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचे उदयनराजेंच्या गोटातून सांगण्यात येत आहे. परंतु या भेटीबाबतचा सविस्तर तपशील अद्याप समजू शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सिलव्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली व त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली व मराठा आरक्षणाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.