वाई : महाविकास आघाडीने शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी मात्र माझी अद्याप उमेदवारीजाहीर झाली नाही त्यात वाईट मानायचं कारण नाही. मला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे असे उदयनराजेंनी सांगितलं आहे. मात्र उदयनराजेंची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली असताना साताऱ्याच्या उदयनराजेंची उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

कोल्हापुरच्या शाहु महाराजांच्या उमेदवारीबद्दल मी त्यांचे स्वागतच करतो. मला लवकर उमेदवारी दिली नाही. यात वाईट मानायचे काहीच कारण नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत थोडं पुढे-मागे होतं. ज्यावेळेस चर्चा होते. त्या चर्चेतुनच काहीतरी चांगल घडतं, असे उदयनराजे भोसले म्हणाले. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने आज दहावी यादी जाहीर करूनही सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार उदयनराजे भोसले यांना ‘अजूनही प्रतीक्षेत ठेवले आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार

दिल्लीहून आल्यानंतर उदयनराजे यांनी ‘आरंभ है प्रचंड’ ही टॅगलाईन घेऊन साताऱ्यात दमदार शक्ती प्रदर्शन केले. मतदारसंघात जाऊन जेष्ठांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बैठकां चा सपाटा त्यांनी लावला आहे. उमेदवारी मिळणारच म्हणून उदयनराजे जिल्हा पिंजून काढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. मात्र दहावी यादी झाल्यानंतरही उदयनराजेंची दिल्ली दरबारातून सत्वपरीक्षा घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. अजून किती दिवस उमेदवारी जाहीर करण्यास वेळ आहे. असा प्रश्न उदयनराजेप्रेमी करू लागले आहेत. उमेदवारीं अर्ज दाखल करण्यास दि १२ पासून सुरवात होणार आहे.

हेही वाचा… भाजपाच्या दहाव्या यादीतही उदयनराजे भोसलेंचं नाव नाही; प्रश्न विचारताच म्हणाले, “मोठ्या लग्नाच्या याद्यांना…!”

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.त्यांनी त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी आहेच. लोकांच्या मनात काय आहे ? हे लोकं ठरवतील. एखाद्या माणसाची प्रतिमा बघायची असेल तर त्यांनी वैयक्तिक वाटचाल कशी केली, हे पहावे लागेल. त्यांच्याकडुन समाजसेवा किती घडली आणि काय घडली हे समजेल. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असा सुचक इशारा उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे नाव न घेता दिला.