लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर त्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सोलापुरात तीव्र निदर्शने केली. यावेळी सभापती नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.

CM Eknath Shinde criticizes to Congress leader Rahul Gandhi
मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “आईच्या पदराला धरुन राजकारण…”
MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे आदींच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन केले. सभापती नार्वेकर यांच्याकडून जाहीर झालेला निकाल ठरवून आणि अपेक्षितच होता. यातून लोकशाहीची सरळ सरळ हत्या झाली आहे, अशी प्रतिक्रिया उत्तमप्रकाश खंदारे यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-‘उबाठा’ उल्लेखावर पत्रकार परिषदेत भडकले उद्धव ठाकरे; म्हणाले, “मग इतरांच्या आई-वडिलांची…”

तर चार राजकीय पक्ष फिरून आलेले नार्वेकर हे आता भाजपच्या हातचे बाहुले बनले आहेत. भाजपने त्यांना बक्षिसी म्हणून देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करावी, असा उपरोधात्मक सल्लाही खंदारे यांनी दिला. यावेळी कारमपुरी, वानकर यांच्यासह प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, महेश धाराशिवकर आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.