ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही केली. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर माईक खेचल्याच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्ष नेत्यांवर टीका करताना त्यांनी खेचलेल्या माईकवरुन केलेलं विधान हे शिवसेना संपवण्यासंदर्भातील डाव असल्याचा दावा केलाय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

“ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली ताकद दिली. बाळासाहेब आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा हा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या कालखंडात सांगत राहिले की ठाण्याने मला पहिली सत्ता दिली. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं,” असं म्हणत राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, “ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि शिवसेनेचं ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र निवडणुकांची वाट पाहत आहेत,” असं म्हटलं.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

नक्की वाचा >> खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

तसेच पुढे उद्धव यांनी, “माझं मत हेच आहे यापुढे एक कायदा झाला पाहिजे. ज्यांना कोणाला युती करायची असेल त्यांनी करावी. मात्र त्यांच्यात काय करार झालाय तो जनतेसमोर ठेवा. जागावाटप किती होणार, कोणत्या ध्येय धोरणांवर युती करणार हे करारावर जाहीर करा. म्हणजे काय झालं असतं की माझं आणि भाजपाचं जे ठरलं होतं ते आधी नाकारुन त्यांनी आता केलं. हे जनतेसमोर उघडपणे आलं असतं. दुसरी गोष्ट निवडणुकीनंतर मला जे काय करावं लागलं ते टळलं असतं. महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला. महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिलं की मी शपथ शिवतिर्थावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांच्या स्मारकाच्या साक्षीने शपथ घेतली. शिवतिर्थ पूर्ण फुलून गेलं होतं. लोक नाराज असती तर तिकडे कोणी आलं नसतं,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

“माझं मत असं आहे की आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. नाहीतर आमच्याशी केलेला करार मोडणाऱ्या भाजपाला घरी बसवतील. ते घरी बसतील किंवा आम्ही पाप केलं असेल तर आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला. माझी तयारी आहे. महाराष्ट्राची जनता मला ओळखते. आमची सहावी पिढी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत आहे,” असं म्हणत उद्धव यांनी जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

“या सगळ्या कालखंडात कधी नव्हे तो अघोरी प्रकार होतोय. जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय,” असं म्हणत उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “कारण त्यांना पर्याय नाहीय,” असं उत्तर दिलं. उद्धव यांनी कायद्याच्या आधारे मत व्यक्त करताना, “मी जे काय थोडंफार न्याय कायदेतज्ज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यातून सांगतो की आधी दोन तृतीयांश सदस्य संख्या झाल्यावर वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले ते भलेही दोन तृतीयांश असतील तरी त्यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही हे कायदेतज्ज्ञ सांगतायत. मी कायदा लिहिलेला नाही. वाचलेला नाही. मी घटनातज्ज्ञांनी सांगितलेली मतं ऐकून, त्यांच्याशी बोलून सांगतोय,” असंही स्पष्ट केलं.

पाहा मुलाखत –

“आता या साऱ्याचा अर्थ काय की या गटाला कुठल्या ना कुठल्या गटामध्ये विसर्जित किंवा सहभागी व्हावं लागेल. त्यांच्यासमोर पर्याय काय, एक तर भाजपामध्ये जावं लागेल. सपा आहे, एमआयएम वगैरे सारखे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यात जावं लागेल. हे जर कोणत्या पक्षात गेले तर भाजपाला यांचा जो उपयोग करुन घ्यायचाय तो उपयोग संपेल. कारण त्यांची ओळख त्यांना तीच द्यावी लागेल की आम्ही अमुक एका पक्षात गेलो. म्हणून ते भ्रम निर्माण करतायत की आम्ही म्हणजेच शिवसेना,” असं उद्धव म्हणाले.

नक्की पाहा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिवसैनिकांमध्ये भांडणं लावण्याचा भाजपाचा आणि फडणवीसांचा डाव असल्याचा दावा उद्धव यांनी केला. “मधल्या काळात एक क्लिप फिरली होती बघा. असं माझ्या बाबतीत कधी झालं नव्हतं. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे पण त्यांनी कधी माझा माईक नव्हता खेचला. काहीवेळा त्यांच्याकडे अधिक माहिती असायची अर्थसंकल्प वगैरे काहीबद्दल तर मी सांगायचो की तुम्ही उत्तर द्या. माझ्याकडून कोणी माईक नाही खेचला. आमच्या महाविकास आघाडीत एक सभ्यता होती आणि समन्वय होता,” असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

“माईक खेचून त्यात जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजे शिवसेना. त्यांचा डाव असाय की शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची. शिवसेना संपवायची. एकदा का काम संपलं की पालापाचोळा टोपलीत भरला की नेऊन टाकायचा,” असा टोला उद्धव यांनी भाजपा आणि फडणवीसांना लगावला.

नक्की पाहा >> Video: ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हा’ शब्द उच्चारताच सभागृहात पिकला हशा

“त्यांची अशी योजना होती की बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवायचा त्यांचा डाव होता पण तुम्ही शिवसेना उभी केली,” असं म्हणत राऊत यांनी प्रश्न विचारला असताना उद्धव यांनी, “त्यांच्या पोटात तेच दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत,” असा दावा केला. उद्धव यांनी, “सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चंद्र बोस, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतायत तसे आदर्श पळवायचे. ते आदर्श आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं,” असा टोला भाजपाला लगावला.