Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Marathi News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिलेला एक महिन्याचा अवधीही संपला असून आता त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जातेय, याची उत्सुकता असताना त्या मुद्द्यावर आज ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी परखड भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद दिले!

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण जरांगे पाटलांना धन्यवाद देत असल्याचं नमूद केलं. “मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजूदारपणे त्यांनी आंदोलन चालू ठेवलंय. आज त्यांनी धनगरांनाही साद घातली आहे ही चांगली गोष्ट केली. जालन्यात हे आंदोलन शांततेत चालू होतं. आत्ताचं डायरचं सरकार आहे. जसं जालियनवालामध्ये घुसून इंग्रजांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवलीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर यांनी पाशवी हल्ला केला होता”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जखमी आंदोलकांना भेटायला गेले असताना दिसलेलं चित्र उपस्थितांना सांगितलं.

“मी तिथे गेलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये दिसलं कुणाची डोकी फोडली आहेत, कुणावर छर्रे मारले आहेत. काही घटना ह्रदयात कायम घर करून राहतात”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रस्त्यात घडलेला एक प्रसंग सांगितला.

ते म्हणाले, “आम्ही संभाजीनगरपासून निघून त्या ठिकाणापर्यंत जात होतो. मध्ये थांबून एका घरात गेलो. त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातात पंचारती घेऊन मला ओवाळायला आल्या. मी त्यांना सांगितलं आज ओवाळू नका. मग त्या ताईनं मला राखी बांधू का? राखी बांधताना तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी विचारलं काय झालं? तर ती म्हणाली ‘मलाही गुरावानी मारलं. मी कशीबशी निसटले, पण माझी सून आणि मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे’. त्याच ताईंचा फोटो आला होता पोलिसांशी भांडतानाचा. मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांच्या सून माझ्यासमोर बेडवर होत्या. तिथे मला सांगितलं की यांचं डोकंही फोडलं आहे. एवढं निर्घृणपणे तुम्ही वागता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला केला आहे.

“मी मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाचा प्रश्न होताच”

“मीही मुख्यमंत्री होतोच. त्याही वेळी हा प्रश्न होताच. मराठा आंदोलन तेव्हाही होतंच. पण कुणीही सांगावं की मी कधी कुणावर लाठीहल्ल्याचा आदेश दिला होता का? पोलीस असे रानटीपणे वागू शकतात का? आदेशाशिवाय पोलीस वागू शकत नाहीत. मग हा जालन्याचा डायर कोण आहे?” असा प्रश्नही त्यांनी केला.

“अच्छे दिSSSन..आएंगे”, भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल; म्हणाले, “एखाद्या …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कुठे चाललो आहोत आपण? गद्दारांना म्हणावं तुमच्यात हिंमत असेल तर हा खरा प्रश्न सोडवून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. मराठा समाजाला न्याय द्या. हा विषय इथे सुटणारा नाही. हा लोकसभेत सोडवावा लागेल. आमचा आग्रह होता, की ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे विशेष अधिवेशन घेतलं गेलं, त्या संसदेत मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय घ्या”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.