बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले. १२ तारखेला दुपारी १२ वाजता विजय शिवतारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, याबाबत त्यांनी स्वत:च माहिती दिली. यावेळी विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची ‘विंचवा’शी तुलना केली होती. विजय शिवतारे यांच्या या विधानामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विजय शिवतारे यांच्या या विधानावरून अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. विजय शिवतारे यांना निवडणूक लढवायची असेल तर खुशाल लढवावी”, असा निर्वाणीचा इशारा उमेश पाटील यांनी दिला.

उमेश पाटील काय म्हणाले?

“विजय शिवतारे यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्ही विरोध करण्याचे काही कारण नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्यामुळे ते निवडणूक लढवू शकतात. मात्र, आमचे नेते अजित पवार यांना विंचू म्हणणे, अजित पवार यांची ‘विंचवा’शी तुलना करणे, एवढ्या खालच्या स्थरावर जाऊन बोलणे, चपलेने मारण्याची भाषा करणे, विंचू शब्दाचा प्रयोग करणे, एवढे ऐकूण घेण्यापर्यंत आम्ही लाचार झालेलो नाहीत. विजय शिवतारे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. महायुतीमधील घटक पक्षाचे ते नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विजय शिवतारे भेटले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावले. पण तरीही विजय शिवतारे थांबायला तयार नाहीत.”

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Ajit Pawar, Shrirang Barne,
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

हेही वाचा: नाशिकच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा? हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, भाजपाचे पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीला

“एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असे म्हणायचे. दुसरीकडे महायुतीमधील एक घटक महायुतीतीलच एका नेत्याला अडचण निर्माण करण्याचे काम करत आहे. आमच्या नेत्यावर या स्थरावर जाऊन टीका करत असेल तर निश्चितपणे महायुतीत राहायचे की नाही? हा विचार आम्हाला करावा लागेल, आम्ही एवढेपण लाचार झालो नाहीत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या स्थरावर जाऊन कोणी बोलत असेल तर ही बाब गंभीर आहे”, असा इशारा उमेश पाटील यांनी दिला.

विजय शिवतारे काय म्हणाले होते?

“हा विंचू अनेकांना डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला. अडचण अशी झाली, चप्पल मारावी तर महादेवालाही लागतेय आणि विंचवालाही मारता येत नाही. ही लोकांची भावना आहे. विंचूच्या रुपात असलेल्या फक्त अजित पवारांनाच नाही तर या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा बिमोड करायला पाहिजे”, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले होते.