Urfi Javed and Chitra Wagh Controversy : मागील काही दिवासांपासून उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरत आहे. दोघींनी आजअखेर एकमेकींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, उर्फी समोर आली तर थोबडवणार, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. तर, या विरोधात उर्फीनेही मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली असून, राज्य महिला आयोगातही धाव घेतली आहे. उर्फीने आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची या संदर्भात भेट घेतली. यानंतर रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी महिला आयोगाची भूमिका स्पष्ट केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरण यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, उर्फी जावेदने आज आयोगामध्ये येऊन भेट घेतली. मागील काही दिवसांपासून त्यांना ज्यांनी कुणी धमकी दिली असेल, ही धमकी दिल्यानंतर त्यांना जीवाला धोका वाटतोय. अशा पद्धतीने सातत्याने त्यांना बोललं जातय. त्यामुळे त्यांनी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. त्या दृष्टिकोनातून त्यांना संरक्षण मिळावं, याचसोबत त्यांच्याबरोबर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या माध्यामातून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशा स्वरुपाची मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेदच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम, म्हणाली, “कपड्यांवरुन शिवीगाळ करत…”

याशिवाय, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल राज्य महिला आयोग घेत असतो. त्यामध्ये आज त्यांनी येऊन भेट घेतली आहे. त्यांची तक्रार प्राप्त झाल्यावर निश्चितपणे पोलीस आयुक्तांशी संपर्क करून त्यांची तक्रार पोलीस आयुक्तांकडे पाठवली जाईल. असं म्हणत त्यांनी राज्य महिला आयोगाची भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा – अंगप्रदर्शन करणं महागात पडलं, उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीचे वकील नितीन सातपुते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.