२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह सर्व विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रचाराची रणनीती आखण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून राजकीय पावलं टाकली जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास भाजपा-आरएसएस मागेपुढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

प्रकाश आंबेडकर ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजपा- आरएसएसचा इतिहास पाहता हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपरिक अजेंडा असल्याचे दिसते. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलींप्रमाणे- भारतातील लोकशाहीची आणि देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते (भाजपा-आरएसएस) मागेपुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता वाटते.”

हेही वाचा- “एका बड्या नेत्याचं…”, ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळेच अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी. तसेच राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवावी, अशी गांभीर्यपूर्वक मागणी मी करत आहे”, असंही प्रकाश आंबेडकर ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणाले.