निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> “रावणाने हातात धनुष्यबाण घेतला म्हणून…” संजय राऊत यांची शिंदे गटावर घणाघाती टीका

आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची गरज

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी या आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची गरज आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘शिवसेना भवन’ शिंदे गटाच्या ताब्यात जाणार? संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची संपत्ती…”

शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या बाजूने जाणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर ही लढाई अद्याप संपली नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे आगामी महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या बाजूने जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.