गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. पाटील यांच्या मतदारसंघातच मोदी यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. या सभेआधी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींची लाट संपली असल्याचे त्यांनी म्हटले होते.