रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीच्या आरक्षणामध्ये पुन्हा ना.मा.प्र.स्त्री हे आरक्षण आल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याबाबत निवेदन देत सर्वसाधारण किंवा ना. मा. प्र. असे सरपंचपद आरक्षण ठेवावे अन्यथा येणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालतील व असहकार्य करतील असा इशारा देण्यात आला आहे.

जयगड ग्रामपंचायतीवर सन २००९ ते २०१४ या कालावधीत ना.मा.प्र.स्त्री हे सरपंच पदाचे आरक्षण होते. त्यामुळे आता जर रोटेशन पद्धतीने, सर्वसाधारण” किंवा “ना. मा. प्र.” असे सरपंचपद ठेवले तर ते न्यायोचित होईल. ना.मा.प्र. स्त्री सरपंच पद आरक्षित करण्यात आले, तर आमच्या गावातील संबंधित ग्रामस्थ येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असहकार्य करतील असा इशारा जयगड ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत जयगड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी, माजी सदस्य प्रमोद प्रभाकर घाटगे, शौकत उमर डांगे, जितेंद्र रोहिदास पारकर, मंगेश कमलाकर साळवी या ग्रामस्थांनी रत्नागिरी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत जयगडचे मागील आरक्षण शासनातर्फे सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंच पदाकरीता सर्वसाधारण तर याच कालावधीत २२ एप्रिल २०२५ रोजी आपल्याच अध्यक्षतेखाली सरपंच पद ना.मा.प्र. स्त्री म्हणून सन २०२५ ते २०३० साठी आरक्षित दाखविण्यात आले.

आता पुन्हा आपण संपूर्ण तालुक्याचे सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करणार आहात. तरी २०२५ अजून संपलेले नाही. २०२५ संपेपपर्यंत ग्रामपंचायत जयगडचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असेच ठेवावे. आपल्या या निवडणूक विषयक कार्यक्रमामध्ये जर काही नियमबाह्य व अन्यायकारक इतिवृत्त तयार करण्यात आले तर याविरोधात दाद मागणे हे उच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये येते आणि हे फार खर्चिक आहे. यामुळे आपल्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण २०२० ते २०२५ हा पंचवार्षिक कालावधी खरोखर पूर्ण होईपर्यंत अबाधित.

कालावधी खरोखर पूर्ण होईपर्यंत अबाधित ठेवावे. यदाकदाचित ३१ डिसेंबर २०२५ नंतर जयगड ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली तर ती नवीन आरक्षणाप्रमाणे घेण्यात यावी. आपल्याकडील याबाबत नियोजन चुकले तर सर्व साधारण प्रवर्गातील नागरिक किंवा उमेदवार यांचे नुकसान होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ना.मा.प्र.स्त्री सरपंच पद आरक्षित करण्यात आले, तर आमच्या गावातील संबंधित ग्रामस्थ येणाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालतील व असहकार्य करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.