नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला जिल्हा पोलिस दलाने जनजागरण व जनसंपर्क मेळावे अतिदुर्गम भागात आयोजन करून उत्तर दिले असून ताडगांव येथील   मेळाव्यात २७ भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन करून गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना यापुढे मदत न करण्याचा संकल्प केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिस मदत केंद्र ताडगांव येथील प्रांगणात पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सप्ताहाविरोधात जनसंपर्क मेळावा, महिला सक्षमीकरण, समस्या निवारण, सुरक्षा, तसेच दारू व गुटखाबंदी महिला समिती स्थापन करणे, भरमार बंदुका जमा करणे व नक्षली अत्याचाराबाबत जागृती करणे, यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ताडगांव हद्दीतील मौजा वटेली, धुळेपल्ली, कुडकेली, कोसफुंडी, जोगनगट्टा, ताडगांव, वेंगनुर व इतर गावातील महिला व प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ, असे ४०० ते ५०० लोक उपस्थित होते. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित अध्यक्षस्थानी होते. तसेच ताडगांवचे प्रभारी अधिकारी महारूद्र परजणे, पोलिस उपनिरीक्षक दीपक दळवी, उपनिरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक मिलिंद बोरसे, राज्य राखीव दलाचे कमांन्डट राजेंद्र प्रसाद, पोलिस निरीक्षक मिनाकुमार, उपनिरीक्षक काळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात गावातील महिला दारूबंदी व गुटखाबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच महिला व पुरुषांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांचे सप्ताह पाळण्यास विरोध दर्शवून पोलिसांनी केलेल्या भरमार बंदुका जमा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांच्याकडील १८ भरमार बंदुका व ९ भरमार बंदुकीचे पाईप, अशा २७ बंदुका उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व प्रभारी अधिकारी परजणे यांच्याकडे सुपूर्द केल्या. या ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यापूर्वीही पोलिस मदत केंद्र हद्दीतील इतर ग्रामस्थांनी १९ भरमार बंदुका जमा केल्या होत्या. आजवर ताडगाव येथे ३७ भरमार बंदुका व ९ भरमार बंदुकींचे पाईप बॅरल, अशा ४६ भरमार बंदुका जमा करण्यात आल्या आहेत. भरमार असल्याने नक्षलवादी हे सेंट्री म्हणून त्यांनासोबत नेऊन शक्ती दाखतील, या भीतीने नक्षली छळाला कंटाळून एकजूट दाखवत या बंदुका जमा झाल्या आहेत. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी गावीत यांनी ग्रामस्थांना भरमार बंदुका, दारूबंदी, गुटखाबंदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. नागरिकांना नक्षललवाद्यांचे पैसे न घेण्याबाबत आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers withdraw support from maoists
First published on: 05-12-2016 at 02:59 IST