केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संस्थेतर्फे  आज जाहीर करण्यात आलेल्या अहवालात सावंगी येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठ राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठात द्वितीय क्रमांकावर तर पुणे येथील डी.वाय. पाटील विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानांकन संस्थेने सर्वसाधारण, विद्यापीठ, महाविद्यालय व अन्य श्रेणीत मानांकन जाहीर केले आहे. सर्वसाधारण गटात मेघे विद्यापीठ देशपातळीवर ९७ क्रमांकावर असून विद्यापीठ गटात ६१ व्या क्रमांकावर आहे. राज्यात हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर आले आहे. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचा देशात २९ वा तर राज्यात दुसरा क्रमांक आहे. याच संस्थेच्या शरद पवार दंत महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर १४ वा क्रमांक पटकावला असून, राज्यात हे महाविद्यालय तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच संस्थेच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयास देशात १३९ क्रमांक मिळाला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले  म्हणाले की, विद्यापिठ श्रेणीत आमचे विद्यापीठ गतवर्षी ९१ क्रमांकावर होते. यावर्षी ते ६१ व्या क्रमांकावर आले आहे. ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. महानगराच्या कोणत्याही सुविधा नसतांना या विद्यापीठाने भारतीय वैद्यक परिषदेच्या सर्व अटी लागू करीत हे यश प्राप्त केले आहे. विद्यापीठाच्या रूग्णालयास कोविड‑१९ रूग्णालयाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, करोनाबाधित बहुतांश रूग्णांवर यशस्वी उपचार झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाचे कुलपती दत्ताजी मेघे व विश्वास्त सागर मेघे यांनी विद्यापीठाच्या प्रशासनावर संपूर्ण विश्वाास टाकतांनाच सर्व ते सहकार्य केल्याने ही झेप घेता आल्याचे ते म्हणाले. भारतीय वैद्यक परिषदेद्वारे याच संस्थेला न्यूरो सर्जरी सुपर स्पेशॅलीटी पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परवानगी प्राप्त झाली आहे. सदर अभ्यासक्रम सुरू करणारे मुंबई पुणे पाठोपाठ हे तिसरे महाविद्यालय असून, मध्य भारतातील पहिलेच महाविद्यालय असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha datta meghe ayurvigyan abhimat university is second in the state health science university msr
First published on: 11-06-2020 at 18:15 IST