नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोला हे शिकवायला लागते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवत यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या जेएनयू प्रकरणासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य करताना म्हटले की, आजकालच्या मुलांना भारत माता की जय बोला, हे शिकवायला लागते. या गोष्टी स्वयंप्रेरणेतूनच आल्या पाहिजेत. मात्र, सध्याच्या काळात तसे घडत नाही. याउलट भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2016 रोजी प्रकाशित
नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोलायला शिकवावं लागतं- भागवत
भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 03-03-2016 at 11:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have to tell new generation that tell speak bharat mata ki jay to new generation says mohan bhagwat