महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात परत पाऊस कोसळतोय. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने बरीचशी विश्रांती घेतली आहे. तर आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा लहरीपणा वाढला आहे. अशात जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठे किती पाऊस पडला ते आपण जाणून घेऊ.

आपण जाणून घेऊ कुठल्या विभागात कसा पाऊस पडला आहे.

कोकण विभाग कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर हे जिल्हे येतात. कोकण विभागात जून महिन्यात किती पाऊस पडला? ६६२.५ मिमि इतका पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित होतं. मात्र या विभागात ४६४.६ मिमि पडला. जून महिन्यात कोकण विभागात झालेल्या पावसाचं प्रमाण ७०.१ टक्के इतकं होतं. जुलै महिन्यात १०६३.८ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. हे प्रमाण जुलै महिन्यात १६८७ मिमी इतकं होतं. जुलै महिन्यात सरासरी १५८.७ टक्के पाऊस झाला. तर ऑगस्ट महिन्यात ७६६ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. हे प्रमाण या विभागात ४१.१ टक्के इतकंच राहिलं. १ ते सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत २२५ मिमी पाऊस पडणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत म्हणजे मागच्या १८ दिवसांमध्ये २४२. ८ मिमि पाऊस झाला आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत २७१७ मिमि पाऊस पडतो. हे प्रमाण २७१० मिमि इतकं होतं. त्यामुळे आत्तापर्यंत कोकण विभागात ९९.७१ टक्के पाऊस पडला आहे.

Health Special, registration cancer patients,
Health Special : महाराष्ट्रात कर्करोगबाधित रुग्णांची नोंदणी बंधनकारक कधी करणार ?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
16 districts of the state are anemic malnourished
राज्यातील १६ जिल्हे ऍनिमिया कुपोषित, मात्र ‘या’ २२ गावांची वाटचाल मुक्ततेकडे…
significant drop in average rainfall in Igatpuri 748 mm recorded in Nashik so far
इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
10 new electric buses introduced in Nashik division
नाशिक विभागात नव्याने १० इलेक्ट्रिक बस दाखल
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना

नाशिक विभाग किती पाऊस पडला?

नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर हे जिल्हे येतात. जून महिन्यात नाशिक विभागात १३९.७ मिमि पाऊस पडणं अपेक्षित असतं ते प्रमाण ६८.५ टक्के होतं. त्यामुळे जून महिन्यात एकूण प्रमाणाच्या ४९ टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात २१८ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र २०० मिमि पाऊस झाला. त्यामुळे पावसाचं प्रमाण ९१.६ टक्के इतकं राहिलं. ऑगस्ट महिन्यात १९७.४ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र या विभागात ४९.९ मिमि पाऊस पडला. त्यामुळे हे प्रमाण २५.३ टक्के राहिलं. १ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत ९०.९ मिमि पाऊस पडणं अपेक्षित असतं मात्र आत्ता पर्यंत ११२ मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण १२३.२ टक्के झालं आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ६४६ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र आत्तापर्यंत सरासरी ४३० मिमि पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत या विभागात झालेल्या पावसाचं प्रमाण ६६ .६ टक्के इतकं आहे.

पुणे विभागात किती पाऊस झाला?

पुणे विभागात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे येतात. जून महिन्यात या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे विभागात १९८.६ मिमि पाऊस होणं अपेक्षित होतं. मात्र या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ६८.४ मिमि पाऊस झाला. हे प्रमाण सरासरी ३४ टक्के इतकं राहिली. जुलै महिन्यात पुणे विभागात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण ३२७.२ मिमि असतं. मात्र या महिन्यात ३०४.३ मिमि पाऊस झाला. जुलै महिन्यात या विभागात ९३ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पुणे विभागात २४७ मिमि पाऊस पडणं अपेक्षित असतं जे प्रमाण ७०.४ मिमि इतकंच होतं. त्यामुळे या विभागात ऑगस्ट महिन्यात २८.४ टक्के इतकं होतं. सप्टेंबर महिन्यात जो पाऊस पडतो त्याचं प्रमाण या विभागात मिळून १०३ मिमि असतं आत्तापर्यंत १ ते १८ सप्टेंबरपर्यंत ५८ मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळे ही सप्टेंबर महिन्यातली या विभागाची टक्केवारी ५६ टक्के आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत या विभागात ८७६ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत ५०१ मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळे हे प्रमाण ५७.१८ टक्के इतकं आहे.

औरंगाबाद विभागात किती पाऊस झाला?

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, लातू, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली हे विभाग येतात. जून महिन्यात औरंगाबाद विभागात १३४ मिमि पाऊस होणं अपेक्षित होतं. ते प्रमाण ५५.५ मिमि इतकं होतं. जून महिन्यात या विभागत ४१ टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात या विभागात १८६ मिमि पाऊस पडतो. ते प्रमाण या महिन्यात २७२ मिमि इतकं होतं. त्यामुळे १४६.३ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात या विभागात १९३.३ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र या विभागात ५४.३ मिमि पाऊस झाला. त्यामुळे या विभागातल्या पावसाची टक्केवारी ऑगस्ट महिन्यात ५४ मिमि होतं त्यामुळे या महिन्यातली टक्केवारी २८ टक्के राहिली. सप्टेंबर महिन्यात ९९.६ मिमि पाऊस पडतो. हे प्रमाण ८२.४ मिमि होतं. त्यामुळे या महिन्यात ८२ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ६१३ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं जे प्रमाण ४६४ मिमि राहिलं. या विभागात या कालावधीत पडलेला पूर्ण पाऊस ७५.८ टक्के इतकं राहिलं.

अमरावती विभागात किती पाऊस झाला?

अमरावती विभागात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ हे जिल्हे येतात. या विभागात जून महिन्यात १४७ मिमि पाऊस होतो, मात्र यावर्षी जून महिन्यात या विभागात ४८ मिमि पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या ३२ टक्केच पाऊस जून महिन्यात झाला. जुलै महिन्यात या विभागात २३९ मिमि पाऊस होतो, ते प्रमाण जुलै महिन्यात ३७० मिमि राहिलं. जुलै महिन्यात १५४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात या विभागात २३१ मिमि पाऊस पडणं अपेक्षित असतं, मात्र या महिन्यात या विभागात ७४.८ मिमि पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात पावसाचं प्रमाण ३२.३ टक्के राहिलं. १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत या विभागात ७८.५ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत १०४ मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळे हे प्रमाण १३३ टक्के ठरलं आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ६९७ मिमि पाऊस पडणं अपेक्षित असतं ते प्रमाण ५९९.२ मिमि इतकं होतं. त्यामुळे ८५.९२ टक्के पाऊस या कालावधीत या विभागात झाला.

नागपूर विभागात किती पाऊस झाला?

नागपूर विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. जून महिन्यात या विभागात १८७.१ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र हे प्रमाण १२६ मिमि राहिलं. जून महिन्यात ६७ टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात या विभागात ३६२ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं, या विभागात या कालावधीत ४६८ मिमि पाऊस झाला. त्यामुळे जुलै महिन्यात या विभागात १२९ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात या विभागात ३४७. ८ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं, मात्र २०३ मिमि पाऊस पाऊस झाला. या विभागात या महिन्यात पावसाचं प्रमाण ५८ टक्के राहिलं. सप्टेंबरच्या १८ दिवसांमध्ये १०५ मिमि पाऊस पडणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत १७६.९ मिमि पाऊस झाला. या विभागात या १८ दिवसात पावसाची टक्केवारी १६८ टक्के राहिली. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत १००२ मिमि पाऊस या विभागात अपेक्षित होता. हे प्रमाण या कालावधीत ९७५ मिमि इतकं राहिलं. ९७ टक्के पाऊस या विभागात आत्तापर्यंत झाला आहे. या संपूर्ण आकडेवारीचा विचार केला तर लक्षात येतं की महाराष्ट्रात एकूण ८५ टक्के पाऊस झाला आहे.