कराड: अजित पवारांना आपल्यासमवेत काम करायचे होते की नाही हा त्यांचाच व्यक्तिगत प्रश्न होता. ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याने आपण त्यावर बोलणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

राज्य सरकारमध्ये सन २०१० ते २०१४ या कालावधीत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमवेत चार वर्षे वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाईलाजाने काम करावे लागल्याची अजित पवारांनी व्यक्त केलेली खदखद आत्ताच कशी व्यक्त झाली असा काँग्रेसजनांचा प्रश्न आहे. त्यातून राष्ट्रावादी काँग्रेस आणि विशेषतः अजित पवारांबद्दलच्या काँग्रेस नेत्यांच्या संतापाला मोकळी वाट झाल्याचे दिसू लागले आहे.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आणखी वाचा- “मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, अजित पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवारांच्या या टिप्पणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगेचच कोरडे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दादांच्या वक्तव्यावर पृथ्वीराजबाबांनी सडेतोड भाष्य करावे अशी काँग्रेस नेत्यांची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. परंतु, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व विशेषतः अजित पवारांवर पृथ्वीराज चव्हाण बोलतात कमी आणि कृती अधिक करतात याचे प्रत्यंतर आजही आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुना संघर्ष तूर्तास टळल्याचे म्हणावे लागत आहे.