सातारा: महाबळेश्वर येथे दुर्मीळ पांढरे शेकरू आढळले आहे. तहसील भागात झाडाच्या फांद्यावरून उड्या मारताना या महाखारीचे महाबळेश्वरवासीयांना दर्शन घडले. तिला पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी झाली. यापूर्वीही महाबळेश्वरच्या जंगलं परिसरात अशी पांढऱ्या रंगातील शेकरू आढळली होती.

महाबळेश्वर येथील जंगलं परिसर बऱ्याच वन्य जीवांचा अस्तित्व असून या वन्यजीवांमध्ये प्रमुख आकर्षण हे येथे आढळणाऱ्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरुचे आहे. शेकरू ही खारीसारखीच पण तिच्यापेक्षा आकाराने मोठी असते. म्हणून हिला महाखार असेही म्हणतात. महाबळेश्वर परिसरामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणावरती आढळतात. बऱ्याचदा येथील झाडांवरून उड्या मारत फिरताना त्या आढळतात. झाडावरील फळे हा त्याचा मुख्य आहार तर झाडाच्या सुरक्षित उंचीवर सुक्या काटक्यांच्या साहाय्याने ती आपले घर बांधते.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निवडणूक काळात ठाकरेंच्या शिवसेनेची कठोर भूमिका; पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी खासदाराची हकालपट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा वन्य प्रण्यांमध्ये ‘मेलानीन’च्या कमतरते मुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत असतो. यातूनच या शेकरूचा रंग पांढरा झाला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. अशी पांढऱ्या रंगातील शेकरू दिसणे तसे दुर्मीळच. महाबळेश्वर येथील गावठाणात तहसील भागात झाडाच्या फांद्यावरून उड्या मारताना ती आज आढळली. तिला पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी झाली. यापूर्वीही महाबळेश्वरच्या जंगलं परिसरात अशी पांढऱ्या रंगातील शेकरू आढळली होती.