scorecardresearch

Premium

“भाजपाबरोबर जाण्याची पहिली भूमिका…”, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, YB सेंटरचा उल्लेख करत म्हणाले…

रोहित पवारांनी अजित पवार गटावर आज निशाणा साधला होता. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amol Mitkari on rohit pawar
अमोल मिटकरी काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना चारही राज्यांच्या निकालाबाबत भाष्य केलं. तसंच, भाजपाचा उल्लेख करत राज्यातील राजकीय परिस्थितीवरही टिप्पणी केली. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं”, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Prashan kishor and nitish kumar
“नितीश कुमारांना शिव्या देणारे भाजपा समर्थक आज…”, प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले, “पलटूरामांचे सरदार…”
Vijay Wadettiwar
“छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ…”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ कृतीवरून मुख्यमंत्र्यांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Yash Chouhan Delhi Murder Case
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या

हेही वाचा >> “…तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व शिंदे गटाची होईल”, रोहित पवारांचा टोला; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले…

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर काय?

“रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं, भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबांसमोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडतोय, भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते? आता हा तळतळाट कशासाठी?” असं अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालात तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदींचाच वरचष्मा राहिल असं सत्ताधारी म्हणत आहेत. तसंच, विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who was the first to take the initiative to go with the bjp amol mitkari direct question to rohit pawar sgk

First published on: 05-12-2023 at 13:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×