शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं की ज्या भागात युद्ध सुरु आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झालं आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मात्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्दैवाने इस्रायलची बाजू घेतली आहे. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या टीकेचा समाचा आता भाजपाकडून घेतला जातो आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी X वर पोस्ट करुन शरद पवार हे सगळं मतांच्या राजकारणासाठी करत आहेत की आणखी काही कारण आहे? असा प्रश्न विचारला आहे.

हे पण वाचा- “… तर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात”, इस्रायली लेखक आणि इतिहासकार युवाल हरारी यांनी व्यक्त केली चिंता

काय म्हटलं आहे विनोद तावडेंनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले आहेत, यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की सध्या जगात सुरू असणारी लढाई ही दहशतवाद आणि दहशतवादविरोधी राष्ट्रे यांच्यादरम्यान सुरू आहे. अशावेळी दहशतवादी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठिंबा देणे क्रमप्राप्तच आहे. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटना, त्यामध्ये किती लोक बळी गेले, हे सर्व शरद पवार यांनी आठवावे. असे असतानाही शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनता जाणतेच! असं म्हणत विनोद तावडेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.

What Sharad Pawar Said About Modi?
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

देवेंद्र फडणवीस यांचीही टीका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर याच मुद्द्यावरुन टीका केली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा. अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे पण वाचा- “हमासने शांतता प्रस्थापित होण्याचे सगळे मार्ग…..”, इस्रायली लेखक युवाल हरारी काय म्हणाले?

पॅलेस्टाईनच्या समर्थनात काही संघटनांनी उत्तर प्रदेश, कोलकाता आणि चेन्नईत मोर्चे काढल्याचं अलिकडेच पाहायला मिळालं. त्याचबरोबर काही पक्षांनीदेखील पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनात भूमिका मांडली. मात्र त्यांच्यावर भाजपाने टीका केली आहे.