Chhagan Bhujbal On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. खरं तर जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं, तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला होता. मात्र, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली.

दरम्यान, आता धनंजय मुंडेंचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश होणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र, याबाबत छगन भुजबळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे निर्णय घेतील, असं भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, पत्रकारांनी छगन भुजबळ यांना एक प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच संतपाल्याचं पाहायला मिळालं.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आरोप होत असतात, कधी-कधी आरोप बरोबर असतात, तर कधी ते आरोप चुकीचेही असतात. मग त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे न्यायालयात जाणं आणि पूर्णपणे आरोपांची छानणी करणं. समजा त्यांच्यावरील आरोपांची छानणी केल्यानंतर जर असं आढळलं की धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करण्यात आले. त्या आरोपांची छानणी केल्यानंतर हे समोर आलं की त्या आरोपात काही तथ्य नाही. त्यामुळे न्यायालयाने त्या प्रमाणे निर्णय दिले. त्यामुळे ते आता सर्वांनी स्वीकारला पाहिजे. राजकारण आणि समाजकारणात कधी-कधी आमच्याकडून चुका होतात, कधी आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का?

छगन भुजबळ यांना धनंजय मुंडेंच्या पुन्हा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले की, “धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तो’ प्रश्न विचारताच भुजबळ संतापले

धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली तर तुम्ही राजीनामा देण्याच्या संदर्भात तुम्ही एक विधान केलं होतं. या प्रश्नावर छगन भुजबळ हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. भुजबळ म्हणाले की, “धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली का? चला पुढे, काहीतरी विचारत नका बसू. धनंजय मुंडे यांच्यावर मुळचे आरोप काय आहेत? ते आरोप वेगळे आहेत. संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात आरोप झाले. मग त्यांना जी क्लिन चीट मिळाली ते आरोप कृषीखात्याच्या संदर्भातील आहेत. मग असे प्रश्न कशाला विचारता? आता तुम्हाला परत उत्तर देणार नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही जर वडाची साल पिंपळाला लावली तर तुमची मी तक्रार पण करेन. मी असं सांगितलं होतं की त्यांच्यावरील (धनंजय मुंडे) आरोप निर्दोष ठरले तर मी त्याबाबतचं विधान केलं होतं”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.