संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार का? रामदास आठवलेंनी दिले संकेत, म्हणाले…

राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.

संग्रहीत फोटो

राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. संभाजीराजे यांना शिवसेना राज्यसभा देत असेल, तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज डोंबिवली येथील संदप गावात होते. गावातील खदाणीत बुडून मृत पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी ते याठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी गायकवाड कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर पत्रकारांनी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याबाबत विचारलं.

पत्रकाराच्या प्रश्नाला प्रतिसाद देताना आठवले म्हणाले की, ‘संभाजीराजेंनी शिवसेनेत जाऊ नये. त्यांना भाजपाने सहा वर्षांसाठी राज्यसभा दिली होती. त्यांनी भाजपामध्ये राहिलं पाहिजे. पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘त्यांना कोणत्या पक्षात जायचं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे. पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will sambhaji raje bhosale join shivsena ramdas athawale give clue in dombivli rmm

Next Story
उजनी पाणी प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी